लोकसभेच्या उमेदवारीसाठी स्वरा भास्कर इच्छुक? काँग्रेस पक्षाकडून लढण्याची शक्यता

लोकसभेच्या उमेदवारीसाठी स्वरा भास्कर इच्छुक? काँग्रेस पक्षाकडून लढण्याची शक्यता

देशातील विविध विषयांवार बेधडक व्यक्त होणारी अभिनेत्री स्वरा भास्कर राजकारणात येऊ शकते. या लोकसभा निवडणुकीत ती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे.

स्वरा भास्करबद्दल बोलले जात आहे की, स्वरा दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वरा भास्करच्या नावावर विचार करण्याबाबत आश्वासन दिले आहे. स्वरा भास्कर अनेकदा केंद्र सरकारवर टीका करताना दिसली आहे. 2020 मध्ये, तिने महाराष्ट्रात CAA विरोधात आयोजित केलेल्या जाहीर सभेतही सहभाग घेतला होता.त्यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. एवढेच नाही तर अलीकडेच ती राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेतही दिसली होती. स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद देखील राजकारणात सक्रीय आहे. तो समाजवादी पार्टीची युवा शाखा, समाजवादी युवा सभेचे राज्य (महाराष्ट्र) अध्यक्ष आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;