IPL 2024 : हे तीन खेळाडू पहिल्यांदाच दिसणार कर्णधारपदाच्या भुमिकेत…

IPL 2024 : हे तीन खेळाडू पहिल्यांदाच दिसणार कर्णधारपदाच्या भुमिकेत…

आयपीएल 2024 चा धमाका आजपासून (22 मार्च 2024) सुरू होणार आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम इतर हंगामांपेक्षा विशेष ठरणार आहे. कारण नवीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली सहा संघ मैदानात शड्डू ठोकून उतरणार आहेत. बंगळुरुचे एम. चिन्नास्वामी स्टेडीयम आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सज्ज झाले असून ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई तर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरू यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे.

आयपीएलच्या विजेतेपदासाठी 10 संघ आपआपसात भिडतील. विशेष म्हणजे 10 संघांपैकी 6 संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. तर तीन कर्णधार हे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना पहायला मिळणार आहेत. आयपीएल सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी आपले कर्णधार बदलले आहेत. कोलकाताने यंदा नितीश राणाच्या ऐवजी श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवत त्याला कर्णधार पद सोपवले, त्यामुळे पुन्हा एकदा श्रेयसवर कर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने डेविड वॉर्नरच्या जागी ऋषभ पंतवर संघाची धुरा सोपवली आहे. तर सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिंन्स, चेन्नई सुपरकिंग्जने ऋतुराज गायकवाड, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या आणि गुजरातने शुभमन गिलकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे.

सहा नवीन कर्णधार आयपीएलच्या या हंगामाध्ये पाहायला मिळणार आहेत. तर पॅट कमिंन्स, शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे तीन खेळाडू पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहेत. या तीन खेळाडूंमध्ये पॅट कमिंन्स हा सर्वात अनुभवी कर्णधार आहे. ऋतुराज गायकावडच्या नेतृत्वात टीम इंडीयाने 2023 मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;