Lok Sabha Election 2024 – भाजपने आणखी एक मित्र गमवला! आता ‘या’ पक्षासोबतही फाटलं; स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ

Lok Sabha Election 2024 – भाजपने आणखी एक मित्र गमवला! आता ‘या’ पक्षासोबतही फाटलं; स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करताच देशातील राजकारण तापले आहे. भाजपने निवडणुकीसाठी आधीपासूनच तयारी केली असली ओडिशात मोठा झटका बसला आहे. ओडिशात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलातील युतीची चर्चा निष्फळ ठरली आहे. यामुळे मोठा ओडिशात भाजपला स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. ओडिशा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भाजप आणि बीजू जनता दलात गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि बैठका सुरू होत्या. दोन्ही पक्षांत युती होईल आणि एकत्र निवडणूक लढवणार, अशी जोरदार चर्चा होती. पण बीजेडी सोबतची चर्चा निष्फळ ठरली आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

ओडिशात यंदा लोकसभा निवडणुकीसह विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. ओडिशात लोकसभेच्या 21 जागा आहेत. तर विधानसभेच्या 147 जागा आहेत. या निवडणुकांसाठी भाजप आणि बीजेडीमध्ये युती होणार अशी जोरदार चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजपला अधिक जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात बीजेडीला अधिक जागा देण्याच्या आधारावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. पण दोन्ही पक्षांतील चर्चा फिस्कटली आहे.

युती न झाल्याने आता भाजप नेत्यांचा जळफळाट झाला आहे. ओडिशातील भापजचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी ट्विट करून राज्यातील बीजेडीचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकार टीका केली आहे. ज्या राज्यांमध्ये डबल इंजिन सरकार आहे तिथे विकास आणि गरीब कल्याण कामे वेगाने होत आहेत. पण ओडिशात मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्षात पोहोचत नाहीयेत. यामुळे ओडिशातील गरीब मात भगीनींना त्यांचा लाभ मिळत नाहीये, असे म्हणत भाजपने आपला जळफळाट व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;