भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ, आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात FIR दाखल
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सांगितले. निवडणूक मंडळ आणि ब्रुहत बंगळुरू महानगरपालिका (BBMP) अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तेजस्वी सूर्या बंगळुरू दक्षिण येथील खासदार आहेत. तसेच भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. अलिकडेच त्यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आणि दोन समाजात वैर पसरवल्याचा आरोप केला होता. त्यांनी 19 मार्च रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ आणि YouTube वर अशीच एक पोस्ट केली होती. ज्याला 10 लाख व्ह्यूज, 587 कमेंट्स, 5400 रिट्विट्स आणि 13 लाईक्स मिळाले होते.
या प्रकरणात पुढे आरोप होता की, ‘एक्स’ वर त्याचे 13 लाख फॉलोअर्स आहेत. ज्यामुळे ते मतदारांवर प्रभाव पाडत आहेत आणि समाजातील जातीय सलोखा बिघडवत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे 20 मार्च रोजी हलसूरू गेट पोलीस स्टेशनमध्ये कलम 153A, 295A आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List