IPL 2024 : CSKचा नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी सूर्याभाऊने शेअर केली खास पोस्ट

IPL 2024 : CSKचा नवीन कर्णधार ऋतुराज गायकवाडसाठी सूर्याभाऊने शेअर केली खास पोस्ट

आयापीएलचा हंगाम सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. चिन्नास्वामी स्टेडीयमवर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी कर्णधार ऋतुराजसाठी सूर्यकुमार यादवने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आयपीएल 2024 च्या हंगामाला आज (22 मार्च 2024) रोजी बंगळुरुच्या एम. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. उद्घाटनाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा ऋतुराज गायकवडच्या खांद्यावर सोपवली आहे. ऋतुराजला कर्णधारपद मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने ऋतुराजसाठी एक खास इन्स्टा स्टोरी टाकली आहे. याची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘भाऊ, तुला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल हे नाकारता येणार नाही. पण मला खात्री आही की तू या संघाचा वारसा तुझ्या शांत आणि संयमी स्वभावाने पुढे चालवशील’, असं म्हणत सूर्याने ऋतुराजाला शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद मिळाल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सुद्धा गायकवाडला शुभेच्छा देत धोनी आणि इतर खेळाडू त्याला योग्य ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले आहे. ऋतुराजने यापूर्वी आशियाई खेळांमध्ये हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडीयाने सुवर्ण पदक पटकावले होते. महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने 2023 साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्तावात चेन्नईचा संघ काय कमाल करतो ते येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;