Arvind Kejriwal यांची अटकेनंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘माझे जीवन…’
दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांना ED ने गुरुवारी अकट केली. यानंतर आज (शुक्रवारी) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी अटकेनंतर ते पहिल्यांदाच समोर आले आणि प्रतिक्रिया व्यक्त केली.
केजरीवाल यांनी सांगितलं की, मी तुरुंगात असो वा बाहेर असो, माझं जीवन देशासाठी समर्पित आहे. केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात आणले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची ही पहिली प्रतिक्रिया होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List