विराटपासून विक्रम फक्त 6 धावा दूर
विराट कोहली आपल्या आयपीएल कारकीर्दीत अद्याप एकदाही जेतेपद पटकावू शकला नसला तरी त्याच्या बॅटीतून निघालेल्या धावांमुळे तो प्रत्येक सामन्यागणिक नवनव्या विक्रमांना गवसणी घालतो. आता आयपीएल सुरू होताच सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या सामन्यात त्याच्या बॅटीतून सहा धावा निघताच तो टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरेल.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱया हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये विराट कोहलीच अव्वल स्थानी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 11,994 धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा (11,156) या यादीत दुसऱया क्रमांकावर आहे, तर शिखर धवन तिसऱया, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे.
चेन्नईला लाभला नवा ‘किंग’, ऋतुराज गायकवाड धोनीचा नवा वारसदार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List