बर्फीवाला पूल पाडण्याची गरज नाही; व्हीजेटीआयचा अहवाल पालिकेला सादर
अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पुलामध्ये अंतराच्या तफावतीमुळे दोन्ही पूल जोडण्याचा प्रश्न निर्माण झाला तरी बर्फीवाला पूल पाडण्याची गरज नसल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिला आहे. याबाबत व्हीजेटीआयने पालिकेला पंधरा पानांचा अहवाल सादर केला आहे. जॅक आणि विशेष अभियांत्रिकी तंत्राचा वापर करून पुलाचे स्लॅब उंचावले जाऊ शकतात असा उपाय सुचवण्यात आला आहे.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण 26 फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूककाsंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता, मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची 2.8 मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
काय आहे अहवालात
व्हीजेटीआयच्या अहवालानुसार बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा पूल गोखले पुलाला जोडण्यासाठी जॅक लावून जोडकाम करता येईल. यासाठी पुलाचे स्तंभ इंजिनीयरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उंच करता येतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही करता येईल. सुमारे तीन महिन्यांत काम होऊ शकते. या कामासाठी अशा प्रकारचे काम करण्याचा अनुभव असलेल्या पाच एजन्सीजचा पर्यायही व्हीजेटीआयने आपल्या अहवालात सुचवला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List