Arvind kejariwal Arrest : हा तर लोकशाहीवर हल्ला; ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind kejariwal Arrest : हा तर लोकशाहीवर हल्ला; ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल

कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ममता बॅनर्जी यांनी लिहीले की, ‘जनतेने निवडून दिलेले दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. मी माझा पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि एकजूट वाढवण्यासाठी सुनीता केजरीवाल यांच्याशी संपर्क साधला आहे. निवडून आलेल्या विरोधी मुख्यमंत्र्यांना जाणूनबुजून लक्ष्य करून अटक केली जात आहे. सीबीआय, ईडीच्या तपास सुरू नेत्यांना विशेष करून भाजपसोबत युती केल्यानंतर त्यावर पांघरुण घातले जात आहे, हे संतापजनक आहे. हा लोकशाहीवर केलेला हल्ला आहे.’

ममता पुढे म्हणाल्या, ‘आमची ‘इंडिया’ आघाडी निवडणूक आयोगाला भेटून विरोधी पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम लक्ष्य करणे आणि अटक करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त करणार आहे. यासाठी तृणमूल काँग्रेसकडून खासदार डेरेक ओ’ब्रायन आणि नदीमुल हक आयोगासोबतच्या या महत्त्वाच्या बैठकीत पक्षाचे प्रतिनिधित्व करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;