आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा कार्यालयासमोर केला निषेध; दोन्ही गट एकमेकांना भिडले

आपच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा कार्यालयासमोर केला निषेध; दोन्ही गट एकमेकांना भिडले

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगर शहरांमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर जोरदारपणे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते समोर आल्यामुळे एकमेकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचा प्रकार सुद्धा घडला आहे. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये कारवाई होणार असे बोलले जात होते.  रात्री त्यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद आज राज्यभर, देशभर सुरू झालेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नगर शहरातील भाजपाच्या कार्यासमोर आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदारपणे निदर्शने करण्यास सुरुवात केली. आजच्या कार्यकर्त्यांनी केसरी वाघ जिंदाबाद च्या घोषणा दिल्या तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली व त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

आपच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होऊ लागले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी केली मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा सुद्धा प्रकार या ठिकाणी घडल्यामुळे एकच खळबळ उडाली या ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;