अशोक सराफ यांची सर्वांत आवडती हिरोइन कोण? फोटो पाहून तुम्हीसुद्धा हसाल!

अशोक सराफ यांची सर्वांत आवडती हिरोइन कोण? फोटो पाहून तुम्हीसुद्धा हसाल!

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याची विशेष छाप सोडणारे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांची आवडती हिरोइन कोण असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. त्याचा उल्लेख त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रातही करण्यात आला आहे. अशोक सराफ यांच्या आवडत्या हिरोइनचं नाव वाचून तुम्ही थक्क व्हाल आणि फोटो पाहून तर तुम्हाला हसू अनावर होईल. कारण त्यांनी आवडत्या हिरोइनबद्दल विचारताच जे नाव घेतलं, त्याचा अंदाज सहजासहजी कोणी बांधू शकणार नाही.

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाने त्याकाळी सर्व रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटातील भावखाऊ भूमिका ही सचिन (सचिन पिळगांवकर) आणि लक्षाची (लक्ष्मीकांत बेर्डे) होती, असं अशोक सराफ म्हणतात. कारण बाईच्या वेषात या दोघांना खूप धमाल करता आली होती. या चित्रपटानंतर एका मुलाखतीत अशोक सराफ यांना त्यांची सर्वांत आवडती हिरोइन कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी “अशी ही बनवाबनवीमधील सचिन” असं उत्तर दिलं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातला हा सर्वांत उत्कृष्ट परफॉर्मन्स होता, असं अशोक सराफ यांचं मत आहे.

अशी ही बनवा बनवीमधील सचिन पिळगांवकर

या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यातील कलाकारांनाही खूप धमाल येत होती, पण तो इतका हिट होईल, याची कल्पनाही त्यांना त्यावेळी नव्हती. हा चित्रपट 32 वर्षांचा रेकॉर्ड करेल, याची कल्पना निदान मला तरी नव्हती, असं अशोक सराफ सांगतात. सचिन पिळगांवकर यांच्या उत्तम चित्रपटांच्या यादीत ‘अशी ही बनवाबनवी’चा नंबर वरचा आहे. अशोक सराफ यांच्या मते या चित्रपटातील त्यांची भूमिका ही कर्त्याकरवित्याची होती. म्हणजे जे काही चित्रपट घडतं, त्याची आखणी करणारे ते आहेत. या गोष्टीमधला मेंदू मी आहे, असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलंय.

‘अशी ही बनवा बनवी’ हा चित्रपट आजसुद्धा अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असेल. त्यातील संवाद, गाणी ही अक्षरश: चाहत्यांच्या तोंडपाठ आहेत. वसंत सबनीस यांनी या चित्रपटातील संवाद लिहिले होते. यामध्ये अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या भूमिका होत्या. त्यांच्यासोबत सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;