Arvind Kejriwal यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका घेतली मागे, आधी ED कोठडीच्या याचिकेविरुद्ध लढवणार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली दारू धोरण प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी मागे घेतली. त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की सक्तवसुली संचालनालयाची राऊस अव्हेन्यू न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेशी त्यांची याचिका क्लॅश होत आहे. ज्यामध्ये केजरीवाल यांच्या ED कोठडीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम लढा त्या याचिकेविरुद्ध करण्यात येईल.
न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती बेला द्विवेदी यांचा समावेश असलेले विशेष तीन न्यायाधीशांचे खंडपीठ केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार होते. आदल्या दिवशी, सर्वोच्च न्यायालयाने अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेविरुद्धच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याचं मान्य केलं.
केजरीवाल हे अटक झालेले पहिले विद्यमान मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, आप नेत्यांनी आज देशव्यापी निषेध आंदोलन केलं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अटकेनंतर ठिकठिकाणी निदर्शनं सुरू झाली आहेत. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या दिल्लीतील काही प्रमुख मंत्र्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List