माजी नगरसेवकाने केली होती ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची फसवणूक, पहिल्या पत्नीला कळालं अन्…

माजी नगरसेवकाने केली होती ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची फसवणूक, पहिल्या पत्नीला कळालं अन्…

‘पप्पी दे पारुला’ या सुपरहिट म्युझिक अल्बममुळे अभिनेत्री स्मिता गोंदकर प्रकाशझोतात आली. चित्रपट, रियालिटी शो आणि म्युझिक अल्बममधील विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पण स्मिताच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक घटना फार कमी लोकांना माहित आहे, ज्याने तिच्या आयुष्याला मोठा धक्का दिला.

सिद्धार्थ बाठियासोबत ओळख आणि लग्न

स्मिता गोंदकरची माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्याशी ओळख झाली. हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या आणि त्यांनी लग्नही केलं. वर्सोवा येथे स्मिता आणि सिद्धार्थ एकत्र राहत होते. थाटामाटात झालेल्या या लग्नामुळे स्मिता खूप आनंदी होती. तिला असं वाटत होतं की, तिला मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि ती स्वतःला भाग्यवान समजत होती. लग्नानंतर काही काळ त्यांचा संसार सुखाने सुरू होता.
वाचा: बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक

तीन महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा

लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर स्मिताच्या आयुष्यात भूकंप आला. एका अनोळखी महिलेचा तिला फोन आला. त्या महिलेने सांगितलं, “मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलंही आहेत.” हे ऐकून स्मिताला धक्काच बसला. तिने याबाबत सिद्धार्थला विचारलं असता, त्याने सांगितलं की, त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. “पहिल्या लग्नाबाबत सांगितलं असतं, तर तू लग्नाला तयार झाली नसतीस, म्हणून मी ही गोष्ट लपवली,” असं कारण त्याने दिलं. इतकंच नव्हे, तर त्याने घटस्फोटाची कागदपत्रं आणि स्मितासोबतच्या लग्नाचं प्रमाणपत्रही दाखवलं. स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ही बाब विसरून पुन्हा संसारात रमली.

लग्नाचा पहिला वाढदिवस आणि पुन्हा धक्का

स्मिता आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे फोटो वृत्तपत्रांमध्येही छापले गेले. पण काही दिवसांनंतर एक महिला स्मिताच्या घरी आली आणि तिने पुन्हा दावा केला की, तीच सिद्धार्थची खरी पत्नी आहे. स्मिताने यावेळी घटस्फोट आणि लग्नाच्या कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा तिला कळलं की, सर्व कागदपत्रं खोटी होती. सिद्धार्थने तिची फसवणूक केली होती.

सिद्धार्थचा बनाव आणि कायदेशीर कारवाई

स्मिताने सिद्धार्थविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांसमोर सिद्धार्थने स्मिताला आपली पत्नी मानण्यास नकार दिला आणि धक्कादायक दावा केला की, “लग्नाचे फोटो खरे नाहीत, ते एका चित्रीकरणादरम्यान काढले गेले होते.” इतकंच नव्हे, तर सिद्धार्थने स्मितासह अनेक तरुणींना असंच फसवलं असल्याचं नंतर समोर आलं. ही बातमी त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमध्ये झळकली होती.

स्मिताचं पुनरागमन

या सर्व घटनेने स्मिता पूर्णपणे कोलमडून गेली होती. काही काळ ती चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण स्वतःला सावरत तिने नव्याने सुरुवात केली आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या धक्कादायक प्रसंगातून तिने स्वतःला सावरलं आणि प्रेक्षकांच्या मनात पुन्हा स्थान मिळवलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;