डोक्यावर टक्कल, बाहेर आलेली ढेरी, सलमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर, 6 पॅकअॅब्सवरून भाईजान ट्रोल!
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतच असतात. त्यात सलमान खानचे नाव तर अस नुकताच सलमान खानचा एक असाच तंच असतं. सलमानचा एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्या व्हिडीओमुळे त्याला बरंच ट्रोल करण्यात येत आहे. सलमानचा ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही.
एका व्हिडीओमुळे सलमान खान ट्रोलर्सचं लक्ष्य बनला आहे
दरम्यान 10 मे रोजी जेव्हा भारत-पाकिस्तान तणावादरम्यान युद्धबंदीची घोषणा करण्यात आली, तेव्हा सलमानकडून एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये त्याने लिहिले ‘युद्धविरामासाठी धन्यवाद’. तथापि, काही काळानंतर ही पोस्ट डिलीटही करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता पुन्हा एकदा सलमान खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. एका व्हिडीओमुळे तो ट्रोलर्सचं लक्ष्य बनला आहे.
सलमान खानचा व्हायरल व्हिडिओ
सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल
सलमान खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवर नाचताना दिसत आहे आणि डान्स स्टेप दरम्यान त्याचा टी-शर्ट वर जातो तेव्हा त्याचे पोट दिसते. पण त्याची पोट सुटलेले, डान्स स्टेप्स करताना ते हालतानाही दिसत आहे. त्यामुळे सलमान खानला सर्वत्र ट्रोल केलं जात आहे ते त्याच्या लठ्ठपणामुळे. तसेच नेटवर एकच प्रश्न विचारलं जात आहे की, तो जे त्याच्या सोशल मीडियावर त्याचे फिटनेसचे, 6 सिक्सपॅकअॅब्सचे फोटो टाकतो किंवा चित्रपटात जे दाखवलं जातं ते सर्व फेक आहे का? त्यावरूनही सलमान खानला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
सोलमोन सर भी मोटा गए?
फिर वो फिल्मों में 6 पैक कैसे दिखाते हैं?pic.twitter.com/LHInxeeh0j
— Shivani Sahu (@askshivanisahu) May 12, 2025
नेटिझन्स काय म्हणत आहे?
एका युजरने सलमान खानचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘सलमान खान सरही जाड झाले आहेत का?’ मग ते चित्रपटांमध्ये 6 पॅक कसे दाखवतात? यानंतर, या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला. एका वापरकर्त्याने हसणारा इमोजी शेअर करत लिहिले आहे की ‘टेक्नोलॉजी’. अजून एकाने लिहिलं की, “ते जाड झाले नाहीयेत, फक्त पोट थोडेसे बाहेर आले आहेत” अनेक वापरकर्त्यांनी असेही म्हटले की त्याचे 6 पॅक शरीर चित्रपटांमध्ये VFX द्वारे दाखवले जाते. तर एकाने लिहिले, ‘चित्रपटांमध्ये बनावट सिक्स पॅक दाखवले जातात ती कॅमेऱ्याची जादू आहे.’
चाहत्यांनी घेतली बाजू
तर ट्रोलर्सप्रमाणे सलमान खानच्या समर्थनार्थही त्याचे अनेक चाहते त्याची बाजू घेताना दिसले. अनेकांनी त्याच्या समर्थनार्थही कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले ‘तो 60 वर्षांचा आहे, त्याला ट्रोल करू नका मित्रांनो, स्वतःच्या फिटनेसकडे पहा”, तर दुसऱ्या एका युजरने लिहिले ” तो 60 वर्षांचा आहे, त्याच्याकडून आणखी किती अपेक्षा करता येईल” .पण या व्हिडीओवर सलमानने अद्याप तरी प्रतिक्रिया दिलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List