अंडरवर्ल्ड डॉनसाठी लोकप्रिय अभिनेत्री करायची धुणीभांडी, स्वयंपाक; अनेक वर्षांनंतर म्हणाली…

अंडरवर्ल्ड डॉनसाठी लोकप्रिय अभिनेत्री करायची धुणीभांडी, स्वयंपाक; अनेक वर्षांनंतर म्हणाली…

Bollywood Actress with Underworld Don: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं आयुष्य आणि करीयर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यासाठी कारण एकच आहे, ते म्हणजे अभिनेत्रींची अंडरवर्ल्ड डॉनसोबत असलेले प्रेमसंबंध. एककाळ असा होता जेव्हा बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डची दहशत होती. अनेक अभिनेत्रींचं करीयर अंडरवर्ल्ड डॉनमुळे नष्ट झालं. असंच काही प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासोबत देखील झालं आहे. अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं कारण मोनिका डॉन अबू सलेम याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

अबू सलेम याच्यासोबत मोनिका रिलेशनशिपमध्ये आहे… हे सत्य जेव्हा सर्वांना कळलं तेव्हा अभिनेत्री अनेकांनी ‘गोल्ड डिगर’ असं म्हटलं. यावर एका मुलाखतीत अभिनेत्री स्पष्टीकरण दिलं आणि धक्कादायक वास्तव सांगितलं. अबू सलेम याच्यासोबत असताना धुणीभांडी आणि स्वयंपाक केल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं.

मुलाखतीत मोनिका म्हणाली, ‘अबू सलेम याच्यावर जीवापाड प्रेम करायची त्यामुळे त्याच्या कृत्यांबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. जेव्हा अबू सलेम याला पोर्तुगाल येथून अटक केली. तेव्हा मला मोठा धक्का बसला. जेव्हा मी त्याच्या विरोधात दाखल झालेली चार्जशीट वाचली मला मोठा धक्का बसला. दंड, गंभीर अपराध, लोकांचे मृत्यू… मी पूर्णपणे कोलमडून गेली.’

‘अबू सलेम पळत आहे… हे मला माहिती होतं. पण चार्जशीट पाहिल्यानंतर माझे डोळे उघडले. अबूकडे पैसा होता म्हणून मी त्याच्यासोबत आहे. असं अनेकांना वाटलं, मी एका राजकुमारीसारखं आयुष्य जगत आहे, असं अनेकांना वाटलं. पण मी प्रचंड वाईट दिवस पाहिले आहेत. मी त्याच्यासाठी साफ-सफाई केली आहे. मी त्याच्यासाठी धुणीभांडी केली आहेत. स्वयंपाक देखील बनवलं आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर मी चांगलं आयुष्य जगली असेल तर फक्त माझ्या आई – वडिलांच्या घरी. त्यानंतर जेव्हा मी स्वतः पैसे कमवायला लागली. पैशांसाठी डॉनसोबत आहे असं सर्वांना वाटायचं. पण कसले आणि कोणते पैसे? काही कारण नसताना मला भोगावं लागलं. मला अडकवण्यात आलं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सांगायचं झालं तर, अबू सलेम याच्यामुळे मोनिका तब्बल 1 वर्ष तुरुंगात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर अभिनेत्री मोठ्या पडद्यावर दिसली नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;