Pahalgam Attack- अखेर पाकिस्तानविरुद्ध मोठे पुरावे सापडले! दहशतवादी हाशिम मुसा आहे पाकिस्तानी सैन्याचा माजी कमांडर

Pahalgam Attack- अखेर पाकिस्तानविरुद्ध मोठे पुरावे सापडले! दहशतवादी हाशिम मुसा आहे पाकिस्तानी सैन्याचा माजी कमांडर

जम्मू आणि कश्मीरमधील पहलगामला 22 एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख नुकतीच पटवण्यात आली होती. त्यात ली भाई आणि आदिल हुसेन ठोकर यांच्यासह हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान यांचे दहशतवाद्यांमध्ये  नाव होते.

दहशतवादी हाशिम मुसा बद्दल एक धक्कादायक खुलासा नुकताच समोर आलेला आहे. त्याचे पाकिस्तान कनेक्शन आता समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी वंशाचा हाशिम मुसा उर्फ ​​आसिफ फौजी उर्फ ​​सुलेमान हा पूर्वी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्स एसएसजी (स्पेशल सिक्युरिटी ग्रुप) चा कमांडो होता. पाकिस्तानी सैन्यातील त्यांच्या सेवेमुळे त्यांना आसिफ ‘फौजी’ म्हणूनही ओळखले जात असे. दीड वर्षापूर्वी पूंछ राजौरीमध्ये घुसखोरी करणारा हा तोच गट आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरक्षा यंत्रणा करत आहेत. डिसेंबर 2023 मध्ये, पूंछमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आणि सैनिकाच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. हे काम याच दहशतवाद्यांचे असू शकते.

पहलगाम येथील हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची नुकतीच ओळख पटली आहे. यामध्ये आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी यांची नावे आहेत. हे दहशतवादी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. ही दहशतवादी संघटना बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा संघटनेची शाखा आहे.

सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद याला नाव दिले आहे. तपास यंत्रणांना असेही आढळून आले आहे की, या दहशतवाद्यांचे पाकिस्तान, मुझफ्फराबाद आणि कराची या ठिकाणांशी संबंध आढळून आले आहेत. बैसरन हल्ल्यानंतर जवानांचे कपडे आणि कुर्ता-पायजमा घातलेले पाच ते सहा दहशतवादी जवळच्या घनदाट जंगलातून आले होते. त्यांच्याकडे AK-47 सारखी धोकादायक शस्त्रे होती. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांवरही सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे घालणार पर्यटकांना साद पुणे घालणार पर्यटकांना साद
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा...
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत सव्वातीन कोटींचा अपहार, एका महिलेसह चौघांना अटक; शाखाधिकारी फरार
तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अ‍ॅक्शन, सांगलीतील 59 ‘डार्क स्पॉट ‘वर करडी नजर
पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती
कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी