शोलेमधील सांभाच्या लेकींना पाहिलंत का? सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींनाही देतात टक्कर, हॉलिवूडमध्येही डंका
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नोंद झालेल्या ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे. गब्बरपासून ठाकूरपर्यंत, जय-वीरूपासून बसंती-राधापर्यंत आणि संभापासून कालियापर्यंत, या सर्व पात्रांनी त्यांच्या अभिनयाने शोले चित्रपट संस्मरणीय बनवला आहे. तसेच या चित्रपटातील ‘अरे ओ सांभा, कितने आदमी थे’ हा डायलॉग तर प्रत्येकाच्या ओठांवर आहे. डायलॉगप्रमाणे सांभाची भूमिका साकारणारे अभिनेते मॅक मोहनही सर्वांच्या तेवढेच लक्षात आहेत. मॅक यांचं बऱ्याच वर्षांआधी निधन झालं आहे पण त्यांचे डायलॉग आजही आजरामर आहेत. पण बऱ्याच जणांना हे माहित नसेल की त्यांची लेकही चित्रपटसृष्टीत मोठी कामगिरी करत आहे.
सांभाच्या लेकींची चर्चा
मॅक मोहन यांनी 1986 मध्ये मिनीशी लग्न केलं आणि त्यांना तीन मुले आहेत. त्यांना दोन मुली मंजरी-विनती आणि एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे विक्रांत.मॅक मोहन यांच्या दोन्ही मुली चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. विनती आणि मंजरी दोघीही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत.अभिनेत्याच्या दोन्ही मुली कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाहीत.
सांभाच्या लेकी नक्की करतात तरी काय?
मंजरीबद्दल बोलायचे झाले तर ती लॉस एंजेलिसमध्ये राहते. मंजरी एक लेखिका आणि दिग्दर्शक आहे. मंजरीने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिने विशाल भारद्वाज आणि ओपेनहायमरचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्यासोबतही काम केले आहे. तिने काही शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शनही केले आहे. तसेच 2016 मध्ये, एएफआय कंझर्व्हेटरीच्या महिला दिग्दर्शन कार्यशाळेसाठी 8 महिलांची निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये तिचे नाव देखील समाविष्ट होते. या कार्यशाळेत सहभागी होणारी ती दुसरी भारतीय ठरली.
एका लेकीला एमी पुरस्कारांसाठी नामांकन
मंजरीला स्केटर गर्ल आणि स्पिन या चित्रपटांमधून यश मिळाले आहे. तिने द लास्ट मार्बल, द कॉर्नर टेबल आणि आय सी यू सारखे अनेक शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. तिने वेक अप सिड आणि सात खून माफमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. स्पिन चित्रपटासाठी तिला एमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. मंजरीने आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातही तिचे काम पाहायला मिळाले. 2014 मध्ये, मंजरीचा लघुपट ‘द कॉर्नर टेबल’ कान्समध्ये इमर्जिंग फिल्ममेकर्स शोकेस श्रेणीमध्ये निवडला गेला. या श्रेणीत निवड झालेली ती एकमेव भारतीय चित्रपट निर्माती होती.
तर एक लेक अभिनेत्री म्हणून पुढे
विनतीबद्दल बोलायचं झालं तर, तिने शाहरुख खानच्या माय नेम इज खान, द कॉर्नर टेबल आणि स्केटर गर्लमध्ये निर्माती आणि अभिनेत्री म्हणून काम केले आहे. ती तिच्या वडिलांच्या नावावर असलेले मॅक प्रॉडक्शन्स चालवते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List