पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी

पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कचरा वाहून नेणारा ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील चेंबूर येथे सिद्धार्थ कॉलनीजवळ शुक्रवारी ही घटना घडली. अब्दुल नाय असे मयत कामगाराचे नाव आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला. यावेळी चालक अल्लाउद्दीन शाह याने वेळीच उडी घेतल्याने तो बचावला. मात्र गंभीर जखमी झाला आहे. तर त्याचा सहकारी अब्दुल ट्रकखाली अडकला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला केला.

अब्दुलला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात आरिफ खान नामक कामगारही जखमी झाला आहे. जखमी कामगारांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;