प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या गाण्यामुळे खरंच भुते येतात? हे गाण लागताच लोकं घाबरायचे
बॉलिवूडमध्ये तसे अनेक गायक प्रसिद्ध आहेत. जे त्यांच्या गाण्यामुळे, त्याच्या गाण्याच्या स्टाईलमुळे लोकप्रिय आहेत. असाच एक प्रसिद्ध गायक ज्याच्या गाण्यांनी आणि त्याच्या गाण्याच्या स्टाईलने सर्वांना वेड लावलं होतं. एक काळ असा होता की सर्वत्र फक्त त्याचीच गाणी असायची. प्रत्येक चित्रपटात त्याच्या आवाजातील गाणी ऐकायला मिळायची.
गाण्याबद्दल विचित्र अफवा
पण या गायकाची जेवढी चर्चा होती त्याहीपेक्षा जास्त चर्चा त्याच्या एका गाण्याची झाली. तेही एक विचित्र कारणामुळे. या गायकाच्या एका गाण्यामुळे चक्क भूत येतात अशी चर्चा सर्वत्र रंगली आणि एकच खळबळ उडाली. तो गायक म्हणजे हिमेश रेशमिया. आजही त्याच्या गाण्यांची क्रेझ कमी नाहीये.
प्रसिद्ध गाण्याला घाबरून असायचे लोक
हिमेश रेशमियाच्या एका गाण्याबद्दल विचित्र चर्चा आहे. इमरान हाश्मी, उदिता गोस्वामी आणि दिनो मोरिया अभिनीत ‘अक्सर’ नावाचा चित्रपट सर्वांना आठवतच असेल. या चित्रपटातील गाण्यांनी एक काळ प्रचंड गाजवला. या चित्रपटातील गाणी सुपरहिट होती. या चित्रपटात एक गाणे होते. इमरान हाश्मीची सर्व गाणी आजही खूप प्रसिद्ध आहेत, पण या गाण्याची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे.
ज्या गाण्याबद्दल ही चर्चा आहे ते गाणे आहे ‘झलक दिखला जा’. हे गाणे आजही प्रत्येकाच्या ओठांवर असतेच. आज हे गाणे कमी ऐकले जात असले तरी, त्यावेळी हे गाणे रिलीज होताच खूप लोकप्रिय झाले होते. मात्र हे गाणे ऐकल्यानंतर लोक घाबरायचे.
गाणं म्हणताच भुते येतात?
त्यावेळी या गाण्याबद्दलची एक अफवा अशीी पसरली होती की, हे गाणे वाजले की भूतं येतात. ही काही छोटी अफवा नव्हती. भलेज नावाचे एक गाव आहे जे गुजरातमधील आणंद जिल्ह्यात आहे. या गावातील अनेक लोक म्हणायचे की ‘झलक दिखला जा’ हे गाणे वाजवल्यावर भुते येतात. लोकांनी असेही म्हटले की ‘एक बार आजा आजा…’ या गाण्याच्या ओळीमुळे गावात विचित्र गोष्टी घडत आहेत.
गावात गाण्यावर घालण्यात आली होती बंदी…
एका रिपोर्टनुसार गावातील रहिवासी फिरोज ठाकोर यांनी दावा केला होता की, एके दिवशी ते हे गाणे गात असताना अचानक त्यांच्या अंगावर काहीतरी आलं. फिरोजच्या भावाने लोकांना सांगितलं की त्याला फिरोजला पीर बाबाकडे घेऊन जावं लागलं जेणेकरून तो बरा होईल. या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वारंवार पसरत होत्या. त्यामुळे या गावात या गाण्यावरच बंदी घालण्यात आली. लोकांनी सांगितले की गावातील सुमारे 8 ते 10 लोकं या गोष्टीचे बळी ठरले होते असंही सांगण्यात आलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List