सहा जिल्ह्यांत शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द, फडणवीसांनी शिंदेंचा आणखी एक निर्णय फिरवला

सहा जिल्ह्यांत शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय रद्द, फडणवीसांनी शिंदेंचा आणखी एक निर्णय फिरवला

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय धडाधड रदद् करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाका लावला आहे. राज्यातल्या शेतकऱयांसाठी शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात घेतला होता. पण गडचिरोली, बीड, जालना, कोल्हापूर, नांदेड अमरावती या सहा जिल्ह्यातील शेतकरी भवन बांधण्यास दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील चार महिन्यात घेतले आहे. त्यामध्ये आता शेतकरी भवनाची भर पडली आहे.

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱया शेतकऱयांना जेवण व मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. . यासाठी शेतकरी भवन नसलेल्या 116 बाजार समित्यांना प्रत्येकी 1 कोटी 52 लाख खर्च करण्यात येणार होते. यासाठी पणन विभाग 50 ते 70 टक्के निधी देण्याचा निर्णय झाला होता. पण राज्याच्या सहकार, पणन विभागाने आदेश जारी करून शेककरी भवनाची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे.

असे होते शेतकरी भवन

शेतकरी भवनाचे मॉडेलही निश्चित करण्यात आले होते. यात तळ मजल्यावर बहुउउदेशीय हॉल, तीन शॉप, पहिल्या मजल्यावर चार रूम, एकूण 20 बेडची ही इमारत असणार आहे. प्रत्येक शेतकरी भवनासाठी 1.52 कोटी रुपये खर्च अपेक्षित असला तरी त्यापैकी 30 ते 50 टक्के खर्च बाजार समितीला आणि उर्वरित निधी राज्य सरकार अशी योजना होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई अंबाबाई, जोतिबा मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई
उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱया भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्या,...
कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला
पाकिस्तानात घुसून मोदींनी नक्षलवाद्यांना खतम केले! बावनकुळेंचे अगाध ज्ञान
जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा
आयएलआर आणि डीप फ्रीजर खरेदीत 63 कोटींचा भ्रष्टाचार, लस खरेदीसाठी बाजारभावापेक्षा दुपटीने, तिपटीने व्यवहार
निवृत्तीनंतर कोणतेही पद स्वीकारणार नाही! संजीव खन्ना यांनी केले स्पष्ट
विद्यार्थ्यांसोबतचे गैरकृत्य लपवल्यास शाळेची मान्यता जाणार, शिक्षण विभागाची कठोर नियमावली