Ather Energy IPO – चालू आर्थिक वर्षातील पहिला मोठा IPO, एथर एनर्जी गुंतवणूकदारांना मालामाल करणार?

Ather Energy IPO – चालू आर्थिक वर्षातील पहिला मोठा IPO, एथर एनर्जी गुंतवणूकदारांना मालामाल करणार?

गेल्या वर्षी शेअर बाजारात तेजीत असल्याने एका मागोमाग एक आयपीओ येत होते. मात्र मधल्या काळामध्ये शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण पसरले आणि कंपन्यांनीही आयपीओ आणणे कमी केला. मात्र आता बाजारात पुन्हा एकदा हिरवळ दिसून येत असल्याने अनेक बड्या कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. अशातच इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी 28 एप्रिल रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. यासाठी 304 ते 321 रुपये प्रति शेअर एवढा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.

28 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. शेअर वाटपाची तारीख 2 मे असून 6 मे रोजी या कंपनीचे शेअर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होणार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील हा पहिलाच मोठा आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांच्या यावर उड्या पडण्याची शक्यता आहे.

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याआधी ‘हे’ वाचा…

– एथर एनर्जीमध्ये टायगर ग्लोबलसह अनेक मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक आहे.
– शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे एथर एनर्जीने आपल्या आयपीओचती साईज कमी केली आहे. कंपनी आयपीओद्वारे 2626 कोटींचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. याआधी हे मूल्य 3100 कोटी रुपयांचे होते.
– आयपीओमध्ये 354.76 कोटींच्या ओएफएसचाही समावेश आहे. त्यामुळे आयपीओद्वारे एकूण 2980 कोटी जमवण्याची कंपनीची योजना आहे. ओएफएसद्वारे 1.1 कोटी शेअर जारी होतील.
– ओएफएसद्वारे प्रमोटर तरुण संजय आणि स्वप्नील बबनलासह अन्य कॉर्पोरेट शेअरहोल्डर्स आपली भागिदारी विकणार आहे.
– एथर एनर्जीमध्ये हिरो मोटोकॉर्पची 40 टक्के भागिदारी आहे. हिरो मोटोकॉर्प पब्लिक ऑफरद्वारे हिस्सा विकणार नाही.
– 2024 मध्ये ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ आला होता, त्यानंतर एथर एनर्जी लिस्ट होणारी दुसरी हिंदुस्थानी इलेक्ट्रिक निर्माता कंपनी बनेल.
– एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी असून इलेक्ट्रिक स्कूटर, बॅटरी पॅक, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सपोर्टिंग सॉफ्टवेअर सिस्टीमच्या डिझाईन, डेव्हलपमेंट आणि ईन-हाऊस असेंबर करते.
– एथर एनर्जीचे प्रमुख उत्पादनांमध्ये एथर 450 आणि एथर रिज्ताचा समावेश आहे. या दोन्ही स्कूटरचे 7 व्हेरिएन्ट बाजारात उपलब्ध आहे.
– तसेच कंपनी इलेक्ट्रिक बाईक्स निर्मितीवरही काम करत आहे.
– बंगळुरू स्थित कंपनीने आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या 9 महिन्यात आपला तोडा 578 कोटींवर आणला असून जो गेल्या वर्षी 776 कोटी होता
– 2024 मध्ये लॉन्च झालेल्या एथर रिज्ताच्या वाढीव विक्रीमुळे कंपनीने तोटा कमी करण्यात यश मिळवले आहे.

(ही फक्त आयपीओ बाबत माहिती असून आम्ही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर पाकिस्तानच्या पायलटला हिंदुस्थानने जैसलमेरमध्ये पकडले, पहिला फोटो आला समोर
हिंदुस्थानने जैलसलमेरमध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यातील पायलटला ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप या पायलटबाबतची कोणतीही माहिती समोर...
Operation Sindoor- आयएनएस विक्रांतने पाकिस्तानवर कहर केला, कराची बंदर उद्ध्वस्त!
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणाव वाढला; विमान सेवा कंपन्यांचे निवेदन जारी
Big Breaking Operation Sindoor- पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किमी अंतरावर मोठा स्फोट
देशाच्या सार्वभौमत्वाचे व जनतेचे संरक्षण करायला आम्ही पूर्णपणे तयार, हिंदुस्थानी संरक्षण दल सज्ज
Opertion Sindoor- हिंदुस्थानने पाकिस्तानची एअर वॉर्निंग सिस्टीम (AWACS) केली नष्ट
Operation Sindoor- पाकिस्तानने हमास स्टाईलने हल्ला केला, हिंदुस्थानने दिले चोख प्रत्युत्तर