जनसुरक्षा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला, डहाणूत महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा

जनसुरक्षा कायदा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला, डहाणूत महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा

सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारा जनसुरक्षा कायदा आणण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी डहाणूमध्ये भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. हा कायदा कोणत्याही परिस्थितीत आम्ही लागू होऊ देणार नाही, असा इशारा आघाडीच्या वतीने देण्यात आला असून 20 मे रोजी हिंदुस्थान बंद करण्याची घोषणादेखील यावेळी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या ‘जनसुरक्षा कायदा’ विरोधात डहाणूतील सागर नाक्यावरून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार सुनील कोळी यांना या कायद्याविरोधात निवेदन सादर करण्यात आले. या कायद्याच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने लढणाऱ्या व्यक्ती व संघटनांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

हा कायदा ब्रिटिशांची आठवण करून देणारा

जनसुरक्षा कायदा हा ब्रिटिशकालीन जुलमी कायद्याची आठवण करून देणारा आहे. जनरल डायरने जसा जालियनवाला बागेत गोळीबार केला, तसेच विचार या सरकारचे आहेत. हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. अंबानी-अदानींसाठी सरकार काम करत आहे, तर सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा चालवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आमदार विनोद निकोले यांनी मोर्चाच्या वेळी बोलताना केला. या मोर्चामध्ये पॉलिट ब्युरो सदस्य ब्रायन लोगो, अशोक ढवळे, भूषण भोईर, सुनील मलावकर, भरत वायडा, मधुभाई धोडी, जयेंद्र दुबळा, संजय पाटील, उज्ज्वला डांमसे आदी सहभागी झाले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;