मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा फोटो व्हायरल; हल्लेखोराच्या हातात AK47

मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा फोटो व्हायरल; हल्लेखोराच्या हातात AK47

जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम (Jammu and Kashmir’s Pahalgam) येथे पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो इंडिया टुडेने प्रसिद्ध केला आहे. या फोटोत दहशतवादी एके-47 हातात घेऊन असल्याचे दिसून आले आहे. राखाडी रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला हल्लेखोर हातात एके-47 घेऊन असल्याचे पाठमोरा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंगळवारी दुपारी 2:30 च्या सुमारास ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला.

पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने जम्मू आणि कश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दल आता हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी या घटेनेचे वर्णन केले आहे. ‘गोळीबार होताच पर्यटक गवताळ प्रदेशात आश्रय घेण्यासाठी पळून जात होते. मात्र हा भाग मोकळा असल्याने लपण्यासाठी जागा नव्हती’, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये मृतदेह कुरणावर पडलेले दिसत होते तर स्थानिक लोक मदतीसाठी धावत गेले तेव्हा महिला आक्रोश करताना दिसत होत्या.

हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचा दौरा अर्धवट सोडला आणि बुधवारी सकाळी दिल्लीला परतले. हल्ल्याचा निषेध करताना पंतप्रधानांनी हल्लेखोरांना सोडले जाणार नाही असे आश्वासन देशवासीयांना दिले आहे.

हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावली आहे आणि ते तातडीने सुरक्षा आढावा घेण्यासाठी पहलगामला पोहोचले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;