चंद्रपूरात विविध वॉर्डात भीषण पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा सुरू

चंद्रपूरात विविध वॉर्डात भीषण पाणीटंचाई, टँकरने पाणीपुरवठा सुरू

सुमारे बाराशे ते चौदाशे मिलिमीटर वार्षिक पर्जन्यमान असलेल्या चंद्रपुरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. चंद्रपूर शहर मनपा शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या वॉर्डातही टँकरने पाणीपुरवठा करत आहे. शहराचा पाणीपुरवठा इरही धरण आणि इरई नदी या दोन स्त्रोतांमधून होतो; मात्र अमृत पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा संथ गतीने राबविला जात असल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. शहराच्या अनेक भागात बोरवेल तळाला गेल्या आहेत. परिणामी नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मनपाच्या आठ व खाजगी चार अशा बारा टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या वडगाव, लक्ष्मीनगर, हवेली गार्डन परिसर, जगन्नाथ बाबा वार्ड, रमाईनगर, अष्टभूजा वार्ड, बाबूपेठ, नगिनाबाग, घुटकाळा, गुलमोहर, महाकाली कॉलरी, अंचलेश्वर गेट, राष्ट्रवादी नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा गेट, कृष्ण नगर, इंदिरा नगर यासह अन्य भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. वॉर्डांमध्ये 180 टँकर फेऱ्याद्वारे तहान भागविली जात आहे. शहराच्या एकूण 90 ठिकाणी तात्पुरत्या पाणी टाक्या उभारून नागरिकांना पाणी पुरविले जात आहे. असे असले तरी शहरात पाणीटंचाई आहे हे मानायला प्रशासन तयार नाही. नागरिक मात्र कधी मनपाच्या टँकरची वाट बघत तर कधी पैशाने पाणी विकत घेत आला दिवस पुढे ढकलत आहेत. प्रशासनाकडे यावर उत्तर नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;