काय सांगता! चीनमध्ये 10 जी इंटरनेट सेवा लाँच

काय सांगता! चीनमध्ये 10 जी इंटरनेट सेवा लाँच

हिंदुस्थानात अद्याप 5 जी सेवा लाँच केली जात असताना चीनने मात्र थेट 10 जी इंटरनेट सेवा लाँच केली आहे. हुवावे आणि चाइना युनिकॉम या दोन दिग्गज कंपन्यांनी हेबेई प्रांतातील झियोंगआन न्यू एरिया येथे देशातील पहिले 10 जी मानक ब्रॉडबँड नेटवर्क लाँच केले. यामुळे 90 जीबीची फाईल फक्त 72 सेकंदांत डाऊनलोड होईल. 10 जी इंटरनेट सेवेमुळे 9,834 मेगाबिट्स प्रतिसेकंद (एमबीपीएस) डाऊनलोड, तर 1008 एमबीपीएस अपलोड वेग मिळणार आहे.

10 जी इंटरनेट सेवेमुळे चीनमध्ये आता 4 के चित्रपट अवघ्या सेकंदात डाऊनलोड होतील. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गेम खेळणे, सोशल मीडिया अ‍ॅप्स हाताळणे खूपच स्मूथ आणि सोपे होणार आहे. चीनने जगात सर्वात आधी 10 जी इंटरनेट सेवा लाँच केल्याने जागतिक टेक्नोलॉजीमध्ये चीनचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या मिळणाऱ्या नेटवर्कच्या तुलनेत चीनचे हे नेटवर्क 10 पट वेगवान आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;