निवडणूक न होताच दिल्लीत बसणार भाजपचा महापौर, आपने केला गंभीर आरोप

निवडणूक न होताच दिल्लीत बसणार भाजपचा महापौर, आपने केला गंभीर आरोप

दिल्लीची महापौर निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचा विजय झाला आहे. कारण या निवडणूकीत आम आदमी पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा महापौर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापौर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. पण आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपने यापूर्वीही दिल्ली महानगरपालिका निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वॉर्डांची पुर्नरचना इकडे तिकडे केल्या, तसेच यात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोपही भारद्वाज यांनी केला.

आता भाजपकडे नायब राज्यपाल आहे, त्यांच्याकडे दिल्ली महानगरपालिका आहे इतकंच नाही तर भाजपकडे आता दिल्ली विधानसभेची सत्ताही आहे असेही भारद्वाज म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;