ओटीटी किंग आहे समंथाचा कथित बॉयफ्रेंड; लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत दिले हिट सीरिज
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचे तिरुपती बालाजी मंदिरातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यामागचं कारण म्हणजे समंथा या मंदिरात तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत पोहोचली होती.
यावेळी दोघांनी एकत्र कॅमेरासाठी पोझ दिले नाहीत. परंतु त्यांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. समंथाच्या अफेअरच्या चर्चा ज्याच्यासोबत होत आहेत, तो राज निडिमोरू आहे तरी कोण, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
राज हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याला ओटीटी किंग म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण त्याने ओटीटीवर तीन हिट सीरिजचं दिग्दर्शन केलंय.
राजने सर्वांत आधी मनोज वाजपेयी यांच्यासोबत 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज केली. ही सीरिज सुपरहिट ठरली होती. या सीरिजचा दुसरा सिझनसुद्धा ब्लॉकबस्टर होता. दुसऱ्या सिझनमध्ये समंथाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List