शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी

शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, 35 जण जखमी

शिर्डीला दर्शनाला चाललेल्या भाविकांच्या बसला बुलढाण्यात अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात बसमधील 35 जण जखमी झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला.

आंध्र प्रदेशातील भाविक शिर्डीला दर्शनाला चालले होते. यादरम्यान बुलढाण्यातील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते नांदुरा दरम्यान पहाटेच्या सुमारास बस ट्रकवर आदळली. अपघाताची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

जखमींना तात्काळ उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा जणांना पुढील उपचारांसाठी बुलढाणा येथे रेफर करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;