Meerut Murder Case – पत्नीने पकडले हात तर, प्रियकराने आवळला गळा; विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडली हत्या

Meerut Murder Case – पत्नीने पकडले हात तर, प्रियकराने आवळला गळा; विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडली हत्या

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना मेरठमध्ये आणखी एक भयंकर घटना घडली. येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर, हत्येबाबत कोणाला कळू नये यासाठी पतीच्या मृतदेहाजवळ एक साप ठेवण्यात आला जेणेकरून असे दिसून येईल की मृत्यू साप चावल्याने झाला आहे, परंतु शवविच्छेदनात या हत्येचे कारण समोर आले. या हत्याकांडमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविना असे त्या महिलेचे नाव असून अमित ह तिच्या मृत नवऱ्याचे नाव आहे. तर अमरदीप हे तिच्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमितची पत्नी रविना आणि तिचा प्रियकर अमरदीप यांनाही अटक केली आहे. आता या प्रकरणात रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. माध्यमांशी बोलताना रविताने बरेच काही सांगितले आहे.

हे प्रकरण मेरठच्या बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादात गावचे आहे. अमित हा अकबरपूरचा रहिवासी असून मजूरीचे काम करत होता. आठ वर्षांपूर्वी त्याचे लग्न रविता नावाच्या महिलेशी झाले होते. या दोघांना तीन लहान मुले आहेत. दरम्यान अमितनेच रविता आणि अमरदीपची ओळख करून दिली होती. त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. यावेळी अमितला या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाली. यावेळी त्याने रविताला अमरदीप सोबतचं सगळे संबंध तोडण्यासाठी सांगितले. मात्र रविताने नकार दिला.

रविता आणि अमरदीप यांच्यातील जवळीक अमितला मान्य नव्हती. त्यामुळे त्यांच्यात रोज भांडणे व्हायची. अमित तिला दररोज मारहाण करायचा आणि चुकीचा व्यवसाय करण्यासाठी धमक्या द्यायचा, असे रविताने सांगितले. मी अमरदीपला फोन करेन. तू त्याला मारण्यात मला मदत करशील, असे देखील त्याने मला धमकावले होते. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून त्याचा काटा काढायचे ठरवले. अमरदीपने अमितचा गळा दाबला होता आणि मी त्याचे हात आणि तोंड धरले आणि अमितला मारून टाकले. यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून आम्ही साप विकत घेतला. आणि तो अमितच्या मृतदेहाजवळ सोडला होता. जेणेकरून सर्पदंशामुळे अमितचा मृत्यू झाला असे लोकांना वाटेल, असे ती म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;