मुलाऐवजी बापाची सर्जरी केली, डॉक्टरांचा प्रताप पाहून रुग्णांमध्ये संताप; रुग्णालयाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

मुलाऐवजी बापाची सर्जरी केली, डॉक्टरांचा प्रताप पाहून रुग्णांमध्ये संताप; रुग्णालयाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

राजस्थानमधील एका रुग्णालयात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी रुग्णाऐवजी त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर आपली चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रुग्णाच्या वडिलांना ऑपरेशन थिएटरबाहेर आणून बसवले. कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात ही घटना घडली. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

अटरु परिसरातील मनिषचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. अपघातात त्याच्या हाताला दुखापत झाली होती. यामुळे त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार मनिषवर शस्त्रक्रिया होणार होती.

यादरम्यान जगदीश नामक रुग्णाचीही हाताची शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी जगदीश नामर रुग्ण ऑपरेशन थिएटरबाहेर बसला होता. मनिषच्या वडिलांचे नावही जगदीश होते आणि ते ही मुलासोबत ऑपरेशन थिएटरबाहेर बसले होते. यावेळी डॉक्टरांनी जगदीश नामक रुग्णाला आवाज दिला. मात्र जगदीश नाव ऐकून मनिषचे वडील उभे राहिले.

डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेले. रुग्णाची ओळख न पटवता डॉक्टरांनी जगदीश यांना भूल दिली आणि हातावर कट मारला. यानंतर डॉक्टरांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच जगदीश यांच्या हातावर टाके मारून त्यांना ऑपरेशन थिएटरबाहेर आणून बसवले. यानंतर जगदीश यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली. रुग्णालय प्रशासन डॉक्टरांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;