अभिनेत्रीला बेदम मारहाण, खोलीत बंद केलं आणि…, 20 वर्ष मोठ्या विवाहित सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध, ‘ती’ आज जगते असं आयुष्य

अभिनेत्रीला बेदम मारहाण, खोलीत बंद केलं आणि…, 20 वर्ष मोठ्या विवाहित सेलिब्रिटीसोबत प्रेमसंबंध, ‘ती’ आज जगते असं आयुष्य

Actress Love Life: अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 13 वर्ष मोठे अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्री सायरा बानो यांनी 22 वर्ष मोठे अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केलं. डिंपल कपाडिया यांनी 15 वर्ष मोठ्या राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं. पण बॉलिवूडमध्ये अशा देथील काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःपेक्षा अनेक वर्ष मोठ्या सेलिब्रिटींना डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अशा रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रींनी फक्त आणि फक्त वेदना सोसल्या.

सध्या अशा अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने वयाच्या 18 व्या वर्षी स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आपण ज्या सेलिब्रिटीसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत तो विवाहित असून बाप असल्याचं देखील माहिती असताना अभिनेत्रीने फक्त भावनांचा विचार केला. जो अभिनेत्रीला पुढे जाऊन महागात पडला.

वयाच्या 18 व्या वर्षी 20 वर्ष अभिनेत्यासोबत प्रेमसंबंध ठेवणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आहेत. एका मुलाखतीत खुद्द कंगना यांनी अभिनेता आदित्य पंचोली यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

 

कंगना आणि आदित्य यांच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर दोघांनी लिव्हइन रिलेशवशिपमध्ये राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. पण कालांतराने दोघांमध्ये वाद होऊ लागले. रिपोर्टनुसार, आदित्यने कंगना याने मारहाण देखील केली. अभिनेत्रीला खोलीत बंद केलं आणि अत्याचार केले.

बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना कंगना यांचं नाव अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच कंगना यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज कंगना यांचं कुटुंब बॉलिवूडमधील नसलं तरी, त्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

आज कंगना फक्त अभिनेत्री नसून खासदार देखील आहेत. कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;