प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन, उद्धव ठाकरे, मधु मंगेश कर्णिक, संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार

प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तकाचे उद्या प्रकाशन, उद्धव ठाकरे, मधु मंगेश कर्णिक, संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार

गुन्हे पत्रकारितेतील अभ्यासू-ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत शुक्रवार, 18 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 वाजता पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणाऱ्या या सोहळय़ाला ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, माजी खासदार-पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी तीन दशकांहून अधिक काळ गुन्हे क्षेत्राशी संबंधित पत्रकारिता केली आहे. अंडरवर्ल्डमधील विविध कुख्यात गुन्हेगारी टोळय़ांचा हैदोस, त्या टोळय़ांतील गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाया हा सर्व थरार त्यांनी जवळून अनुभवला. अंडरवर्ल्डच्या त्याच थरारावर आधारित ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ हे पुस्तक प्रभाकर पवार यांनी लिहिले. ते पुस्तक पप्पू प्राची प्रकाशनद्वारे प्रकाशित केले जात आहे. पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन पप्पू प्राची प्रकाशनच्या प्राची पवार यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;