लोकलमध्ये तरुणाची खुलेआम नशेखोरी, डोंबिवली-सीएसएमटी ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल

लोकलमध्ये तरुणाची खुलेआम नशेखोरी, डोंबिवली-सीएसएमटी ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल

कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्यांचा वावर वाढला असतानाच आता लोकलमध्येही नशाखोरी राजरोस सुरू आहे. कल्याण, कसारा, कर्जत, टिटवाळा, खालापूर मार्गावरील अनेक लोकलमध्ये काही हुल्लडबाज तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याच्या तक्रारी आहेत. आता तर डोंबिवली-सीएसएमटी लोकलमध्ये एक नशेडी नशा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

रेल्वे स्थानके आणि लोकलमधील नशेखोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या गर्दुल्यांकडून छेडछाड, हाणामाऱ्यांसारखे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. रेल्वे पोलिसांकडून या गर्दुल्यांविरोधात काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू करण्यात आली. मात्र आता कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे.

लोकलमधील मालडब्यात एक तरुण दिवसाढवळ्या खुलेआम नशा करत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशा गर्दुल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;