लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…

लाडक्या बहीण योजनेबाबत संजय राऊत यांचा दावा काय? राऊत म्हणाले, आता नवा वाद…

8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच देण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावर आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 वर आली आहे, उद्या ती शून्य होईल, असं संजय राऊत म्हणाले.

हे राज्य आर्थिक अराजकाच्या खाईत सापडलंय 

या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या, आव आणला तरी हे राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे, गेल्या सा़डेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपण बिघडलेली आहे, आर्थिक अराजकाच्या खाईत हे राज्य सापडलं आहे. मि. अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनाही त्या चिंतेंन ग्रासलेलं आहे, अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली, की अजित पवार आमच्या फाईली मंजूर करत नाहीत, आम्हाला निधि देत नाहीत. आम्हाला निधि देत नाहीत म्हणजे कोणाला? , हा प्रश्न आमच्या सारख्या लोकांना पडतो , तुमचे जे 5-25 आमदार आहेत, गद्दार आहेत ते फक्त निधि आणि पैशांच्या ताकदीवर तुमच्यासोबत राहिले आहेत, या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का ? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला.

अमित शहांनी यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर दिलं , ते जर लोकांसमोर आलं तर या राज्याचं चित्र स्पष्ट होईल. आम्हाला निधी मिळत नाही हे टुमणं जेव्हा शिंदेंनी लावलं तेव्हा शहांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. यापूर्वीही त्या दोघांमधला संवाद समोर आलेला आहे, मी आधी सांगितलेला संवाद नाकारलेला नाही असं राऊत म्हणाले. आमचीसुद्धा लोकं आहेत, महत्वाची लोकं आहेत, असं राऊत यांनी नमूद केलं.

8 लाख लाडक्या बहिणींना मिळणार 500 रुपये

राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात एकूण आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे नमो योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहिण योजनेचा हप्ता कमी मिळणार असून त्यांना 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर