Summer Tips- उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाण्याचे आहेत खूप सारे फायदे! वाचा सविस्तर

Summer Tips- उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाण्याचे आहेत खूप सारे फायदे! वाचा सविस्तर

उन्हाळा आणि काकडी याचं एक अनोखं नातं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये काकडी केवळ शरीराला थंडावा देत नाही. तर काकडी खाण्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदे होतात. काकडीमध्ये आढळणारी पोषक तत्व उन्हाळ्यात आपले संरक्षण करतात. काकडीतील व्हिटॅमिन-सी, फॉलिक ऍसिड सारखे घटक असतात, यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. काकडीपासून आपण विविध प्रकारचे सलाड, कोशिंबीर यासारखे विविध पदार्थ आपल्या आहारात अगदी आरामात समाविष्ट करु शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा वापर पॅकच्या स्वरूपात केला जातो. आहारात काकडीचा समावेश केल्यास पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

काकडीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. याशिवाय काकडीत व्हिटॅमिन-सी आणि फॉलिक अॅसिड असते, ज्यामुळे त्वचेला संसर्गापासून वाचवता येते.

 

त्वचेवर पडलेल्या सुरकुत्या काकडीच्या सेवनाने कमी होतात.

 

काकडीमध्ये असलेल्या, मॅग्नेशिम आणि पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

काकडीतील कुकुरबीटामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.

 

काकडीमध्ये मुबलक व्हिटॅमिन के असल्यामुळे, काकडी ही हाडांसाठी सुद्धा खूप उपयुक्त मानली जाते. व्हिटॅमिन के हाडांच्या पुरेशा विकासासाठी गरजेचे असते.

 

काकडी हा पाण्याचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यात सुमारे 90 टक्के पाणी आढळते. याशिवाय त्यात असे अनेक गुणधर्म आढळतात, जे शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

काकडी खाण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. काकडीमध्ये मुबलक असलेल्या पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत होते.

 

आहारामध्ये काकडीच्या नियमित सेवनामुळे, पक्षाघात आणि हृद्यविकाराचा झटका यासारखे धोके टाळण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे घालणार पर्यटकांना साद पुणे घालणार पर्यटकांना साद
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा...
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत सव्वातीन कोटींचा अपहार, एका महिलेसह चौघांना अटक; शाखाधिकारी फरार
तरुणांना नशामुक्त करण्यासाठी पोलीस इन अ‍ॅक्शन, सांगलीतील 59 ‘डार्क स्पॉट ‘वर करडी नजर
पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती
कोलकातामध्ये अग्नितांडव; हॉटेल ऋतुराजमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 30 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी