‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?

कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत असले तरी आतून फणसासारखे गोड आहेत. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून अनेकांना हादरा दिला. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील बड्या नेत्यांना घाम फोडला. त्यांच्या राजकीय फटकेबाजीचे त्यांचे विरोधक सुद्धा स्तुती करतात. भरतशेठ यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला.

आधी पटवलं अन् मग लग्न केलं

रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी गोरेगाव शहरांमध्ये भरत गोगावले यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला. त्यांनी आपल्या खास अंदाजात त्याचे प्रेम आणि नंतर लग्नाचा किस्सा सांगितला. आधी पटवलं अन् मग लग्न केलं असे ते म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या विधानाची एकच चर्चा आता रंगली आहे.

ते म्हणाले की, मुंबईत जाऊन केले. पण वडील गावी आहेत. घरची जबाबदारी आहे. मी पत्नीला सांगितलं की आपल्याला गावाला जावं लागेल. मुंबईहून शेती करायला गावी आलो. मात्र गावी जाऊन तिने तेवढीच साथ दिली. भात लावण्यापासून ते काढण्यापर्य़ंत मळणी करण्यापासून सगळं केलं म्हणून आज सुखाचे दिवस बघतोय. पत्नीने पण मला तेवढी साथ दिली, असे कौतुक भरत गोगावले यांनी केले. तिच्या खंबीर साथीमुळे आपला संसाराचा प्रवास सुखाचा झाला असे ते म्हणाले. त्यांच्या या किस्साची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

भरतशेठ गोगावले यांच्या या अनोख्या प्रेमकथेमुळे राजकारणातील एक हळवा कोपरा सुद्धा समोर आला. त्यांनी यावेळी पत्नीने दिलेल्या खंबीर साथीचा आवर्जून उल्लेख केला. तिच्या मदतीमुळे आपल्याला सुखाचे दिवस आल्याचे ते म्हणाले. त्यांनी प्रेमाचा आणि लग्नाचा किस्सा सांगितला. ते कुणबी समाज सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नी सुषमाताई गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;