एल्फिन्स्टन ब्रिजसाठी आज आंदोलन

एल्फिन्स्टन ब्रिजसाठी आज आंदोलन

एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांच्या न्याय्य हक्क तसेच सुविधांसाठी सरकारचे व एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिवसेनेच्या वतीने उद्या, मंगळवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिवडी नाका येथे एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शिवसैनिकांसह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

शिवडी-वरळी उन्नत मार्गामुळे विस्थापित होणाऱ्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे काय झाले, प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या दोन्ही बाजूस नागरिकांना व स्थानिकांना ये-जा करण्यासाठी काय व्यवस्था केली, पश्चिमेकडून पूर्वेकडे येणाऱया रेल्वे ब्रीजचे काम कधी होणार, ब्रीज पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचे काय, प्रभादेवीतून केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णाच्या वाहतूक मार्गाचे नियोजन करावे आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

  • एमएमआरडीएने हाती घेतलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांचे प्रश्न अजूनही सोडवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महायुती सरकारविरोधात स्थानिकांमध्ये मोठा असंतोष आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

आधी पुनर्वसन करा, मगच एल्फिन्स्टन पूल तोडा

गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. या चाळीसोबत आमच्या पिढ्यान् पिढ्याच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वरळी-शिवडी कनेक्टरला आमचा विरोध नाही, पण या पुलासाठी आमचे संसार रस्त्यावर आणू नका. आधी आमचे योग्य पुनर्वसन करा, मगच एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम करा, अशी मागणी येथील प्रकल्पबाधितांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;