‘छावा’ सिनेमानंतर ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, संजय राऊत म्हणाले, ‘सरकारी पुस्तकांमध्ये जे आहे तेच…’

‘छावा’ सिनेमानंतर ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, संजय राऊत म्हणाले, ‘सरकारी पुस्तकांमध्ये जे आहे तेच…’

Sanjay Raut on Phule Film: ‘छावा’ सिनेमानंतर ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला. आता ‘फुले’ सिनेमा 11 एप्रिल रोजी नाही तर, 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमावर आता राजकीय व्यक्ती देखील स्वतःची भूमिका मांडताना दिसत आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘फुले’ सिनेमावर स्वतःचं मत मांडलं आहे. सर्वत्र संजय राऊत यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

‘फुले’ सिनेमावर आरएसएसचा दबाव असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळे सिनेमा प्रदर्शित होण्यात अडचणी येत आहे… असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर राऊत ओम्हणाले, ‘आमच्या पक्षाची एक भूमिका आहे. कालच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझं बोलणं झालं आहे. महात्मा ज्योतिबा फुले देशाचे एक असे महात्मा होते, ज्यांनी देशाच्या सामाजिक सुधारणेसाठी पुढाकार घेतला.’

पुढे संजय राऊत म्हणाले, ‘महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी असंख्य संकटांचा सामना फुले यांनी केला. आता सिनेमात जे काही दाखवलं आहे, ते खोटं तर नाहीये… तेव्हा जे काही झालं होतं ते सर्व रेकॉर्डमध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलं यांच्यावर जे वाड़्मय प्रसिद्ध केलं आहेत. त्यामध्ये सर्वकाही आहे. सरकारी पुस्तकांमध्ये सर्वकाही आहे. तेच सिनेमात दाखवलं आहे. तर सेन्सॉर बोर्ड येथे कुठून आलं?’ असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘सरकारने सिनेमाच्या बाजूने उभं राहायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाची बाजू घ्यायला हवी. ज्योतिबांचा बचाव केला पाहिजे… मी असं म्हणालो तर म्हणतील ही मुर्खता आहे. फुलेंच्या विचारांची रक्षा करायला हवी. मी असं म्हणालो तर, ते त्यांना आवडणार नाही. कारण ते एका विचारसणीची लोकं आहेत जी सत्तेत आहेत. ‘फुले’ सिनेमातील काही सीन आम्ही पाहिले आहेत आणि जे सत्य आहे तेच सिनेमात दाखवण्यात आलं आहे.’ असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

‘फुले’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चरित्रात्मक हिंदी सिनेमा सध्या वादळाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. त्यामुळेच महात्मा फुले जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;