आत्महत्या नाही सरकारी विश्वासघातानं घेतलेला बळी, ‘तो’ फोटो शेअर करत हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा

आत्महत्या नाही सरकारी विश्वासघातानं घेतलेला बळी, ‘तो’ फोटो शेअर करत हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा

सत्तेवर येताच कर्जमाफी करू असे आश्वासन भाजपने आपल्या जाहिरनाम्यात दिले होते. मात्र राक्षसी बहुमत मिळवून सत्तेवर येताच सरकारने घुमजाव केले. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकण्यापेक्षा आपल्या गळ्याभोवतीच दोरीचा फास अटकवून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. नापिकी, पीक विमा नाही, शेतमालाला भाव नाही, सरकारी मदत नाही आणि सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. ही आत्महत्या नाही सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! सरकारने कुंभकर्णी झोपेतून आणि राक्षसी बहुमताच्या नशेतून बाहेर पडून निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे, असे ट्विट सपकाळ यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;