दिल्लीमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच

दिल्लीमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच

दिल्ली-एनसीआरमध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत पार्सल घरपोच मिळणार आहे. स्काय एअर या कंपनीने गुरुग्राम आणि बंगळुरूच्या काही भागांत ड्रोन डिलिव्हरी सुरू केलेली आहे. कंपनीचे सीईओ अंकित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता दिल्ली, फरिदाबाद आणि पूर्ण एनसीआर क्षेत्रात सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता आणि अन्य काही शहरांत ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या स्काय एअर कंपनी गुरुग्राम येथे 28 पिनकोडमधील 70 सोसायटी कव्हर करत आहे. येत्या काळात बंगळुरूमध्येही त्यांची सेवा विस्तारली जाणार आहे.

किती वजन उचलणार

स्काय एअर कंपनीचा ड्रोन सरासरी 4 किलो वजन घेऊन जाऊ शकतो. जास्तीत जास्त 10 किलो वजनाच्या वस्तू उचलू शकतो. दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू, किराणा, औषधे, छोटे गॅजेट्स एकदम सहजतेने सुरक्षितरीत्या पोचवले जाऊ शकतात.

  • स्काय एअर कंपनीची स्थापना 2020 साली झाली. कंपनीने ब्ल्यूडार्ट, शिपरॉकेट, डीटीडीसी अशा 12 लॉजिस्टिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस एकूण 17-18 लॉजिस्टीक कंपन्यांसोबत भागीदारी होण्याची शक्यता आहे.
  • कंपनीने 2024 मध्ये 12 लाख डिलिव्हरी केली. 2025 मध्ये 50 लाख डिलिव्हरीचे लक्ष्य ठेवले आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;