नाशिक आर्टिलरीत भ्रष्टाचार; 15 अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयचा गुन्हा

नाशिक आर्टिलरीत भ्रष्टाचार; 15 अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयचा गुन्हा

नाशिक येथील आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात मुंबई सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी सैन्याच्या महत्त्वाच्या विभागात भ्रष्टाचा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत नोव्हेंबर 2024 मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिकाऱ्यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी करण्यात आली होती. आर्टिलरी सेंटरमधील भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी तपासातून सीबीआयच्या ‘एसीबी’च्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची चर्चा रंगली होती.

या प्रकरणी नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या 15 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या ऑडिटर, अकाऊंटंट, क्लार्क आशा 15 अधिकाऱ्यांवर वेगवेगळय़ा 11 प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;