मुलींच्या पहिल्या शाळेवरून उदयनराजेंचा नवा दावा, मंगेश ससाणे यांची टीका

मुलींच्या पहिल्या शाळेवरून उदयनराजेंचा नवा दावा, मंगेश ससाणे यांची टीका

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर, ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तर महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे, अशी टीका ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केली आहे.

सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल तर, ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरू केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

Phule Movie- फुले चित्रपटाचा टीझर पाहून मत बनवू नका, सारासार विचार करुनच चित्रपट बनवण्यात आलाय! अनंत महादेवन

उदयनराजे भोसले यांनी केलेल्या विधानावरून मंगेश ससाणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे आक्षेप घेतला आहे. नवा शोध लावला आहे. आत्तापर्यंतचे संशोधक, इतिहास तज्ज्ञ फेल ठरलेत, अशी टीका ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केली.

Phule Movie- महाकारस्थान्यांनी स्पाॅन्सर्ड केलेल्या चित्रपटांना बळी पडू नका! अभिनेता किरण माने यांचे आवाहन

स्त्रियांची पहिली शाळा प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली या उदयनराजेंच्या वक्तव्याचा ससाणे यांनी समाचार घेतला आहे. ‘उदयनराजे यांचं वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं. महात्मा फुलेंचं महत्त्व कळल्याने उदयनराजे हे फुले वाड्यावर आलेत असं वाटलं. इथं येऊन जयंतीच्या दिवशी, फुलेंच महत्त्व कमी करायचं. त्यांच्या पूर्वजांचं महत्त्व वाढवलं’, असं मंगेश ससाणे म्हणाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला’, असं मंगेश ससाणे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;