कृषीमंत्र्यांनी हे ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं, रोहित पवार यांची माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका

कृषीमंत्र्यांनी हे ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं, रोहित पवार यांची माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका

कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच पिकवतो आणि कांद्याचे भाव कोसळतात असे वादग्रस्त विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. कोकाटेंनी हे ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच अजित पवारांनी शेती समजणाऱ्या व्यक्तीला हे खातं द्यावं अशी विनंततीही केली आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा!

कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, निर्यातशुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्यसरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्हज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल.

तसेच कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे, परंतु विद्यमान कृषिमंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे असेही रोहित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;