अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद

अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगड येथे अभिवादन कार्यक्रम 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी खारपाडा ते कशेडी वाहतूक बंद ठेवली आहे.

12 एप्रिल रोजी शिवप्रेमीही मोठ्या संख्येने किल्ल्यावर येणार आहेत. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून 12 एप्रिल रोजी पहाटे 1 ते दुपारी 3 पर्यंत खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या वाहतूक बंदीतून दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने, रुग्णवाहिका यांना वगळले आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;