चावणारी मेहुणी सुटली; कोर्ट म्हणाले, माणसाचे दात धोकादायक नाहीत

चावणारी मेहुणी सुटली; कोर्ट म्हणाले, माणसाचे दात धोकादायक नाहीत

नातेवाईकाचा चावा घेतला म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या महिलेला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलासा दिला आहे. माणसाच्या दातामुळे गंभीर दुखापत होऊ शकत नाही त्यामुळे ते धोकादायक नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने महिले विरोधातील एफआयआर रद्द केला.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार तक्रारदार महिलेचा तिच्या मेहुणीने चावा घेतला होता. त्यामुळे धोकादायक शस्त्रांनी नुकसान पोहोचवणे, एखाद्याला दुखापत करणे या कलमांतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

न्यायालय काय म्हणाले

z या प्रकरणात तक्रारदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून असे निदर्शनास येते की, दातांच्या खुणांमुळे साधी दुखापत झाली आहे.

z भारतीय दंड संहितेच्या कलम 324 (धोकादायक शस्त्राच्या मदतीने एखाद्याला इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा सिद्ध होत नसताना आरोपीला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;