पावसामुळे मंदिरावर झाड कोसळले, 6 जणांचा मृत्यू; 8 गंभीर जखमी

पावसामुळे मंदिरावर झाड कोसळले, 6 जणांचा मृत्यू; 8 गंभीर जखमी

बिहारमधील नालंदा जिल्ह्याला वादळीवारा आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांनी मंदिरात आसरा घेतला. यादरम्यान वादळामुळे मंदिरावर झाड कोसळले आणि ढिगाऱ्याखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला. अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नालंदा जिल्ह्यातील सदर प्रखंड येथील नगवा गावात ही घटना घडली. जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने थैमान घातले. पावसापासून बचाव करण्यासाठी 12 ते 15 जण जवळच असलेल्या देवीच्या मंदिरात शिरले. याचदरम्यान वादळी पावसामुळे मंदिरावर झाड कोसळल्याने मंदिराची भिंत कोसळली.

भिंत अंगावर पडल्याने नागरिक ढिगाऱ्याखाली दबले. घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गुरुवारी बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून आणि पावसामुळे एकूण 25 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;