कल्याणमधील बोगस बीएड कॉलेज बंद, विद्यापीठाचे आदेश; युवासेनेचा दणका

कल्याणमधील बोगस बीएड कॉलेज बंद, विद्यापीठाचे आदेश; युवासेनेचा दणका

विद्यापीठ कायद्याच्या नियमांची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करता कल्याणमध्ये सुरू असलेले आयआरएनई बी.एड महाविद्यालय युवासेनेच्या दणक्यामुळे अखेर बंद झाले आहे. या महाविद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण दिले जात होते.

या महाविद्यालयाची स्वत:ची इमारत नाही. तसेच या महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे शिक्षक-शिक्षककेत्तर कर्मचारी नाहीत, ग्रंथालय नाही. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी महाविद्यालयात येतच नाहीत अशी गंभीर स्थिती होती. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एक ठराविक रक्कम घेऊन त्यांना शिक्षकाची म्हणजे बी.एड ची पदवी दिली जात होती. या बोगस प्रकरणासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाचादेखील पाठिंबा असल्याचे समोर आले होते.

कॉलेजला दहा लाखांचा दंड

सदर महाविद्यालय यूजीसी व विद्यापीठाच्या नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे अशी तक्रार युवासेना सहसचिव अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना लेखी निवेदन दिले होते. याची दखल घेऊन विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमली होती. चौकशीनंतर या ठिकाणची फसवणूक समोर आल्यामुळे सदर संस्थेला दहा लाखांचा दंड ठोठावून कॉलेज बंद करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;