मेधा कुलकर्णी भाजपच्या बैठकीतून निघून गेल्या

मेधा कुलकर्णी भाजपच्या बैठकीतून निघून गेल्या

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीने डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली. याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत शहराध्यक्षांना पत्र लिहिले. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीदेखील त्यांना प्रत्युत्तर दिले. यावरून शहर भाजपमधील कोल्डवॉर समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या चिंतन बैठकीत शहरातील नेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेतल्याने मेधा कुलकर्णी एकटय़ा पडल्याने बैठकीतून निघून गेल्या. मेधा  कुलकर्णी यांना पूर्वनियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे त्या निघून गेल्या असे सांगण्यात आले. भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनावरून झालेल्या वादावर बैठकीत चर्चा झाली. कोणतीही गंभीर घटना घडल्यानंतर त्यावर आंदोलन करणे, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मात्र त्यावर पदाधिकाऱ्यांकडून जाहीर टीका होणे योग्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुरलीधर मोहोळ यांनी महिला आघाडीच्या आंदोलनाचे समर्थन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;