भटक्या कुत्र्याला गोळी घालून ठार मारलं, भर रस्त्यात बंदुकीतून गोळीबार

भटक्या कुत्र्याला गोळी घालून ठार मारलं, भर रस्त्यात बंदुकीतून गोळीबार

झारखंडमधील रांचीमध्ये भटक्या कुत्र्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटका  कुत्रा नागरिकांना त्रास देत होता. या कुत्र्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच रागातून एका वक्तीने रस्त्यावरच्या त्या कुत्र्याला गोळी मारून ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एक कुत्रा अनेक लोकांना त्रास देत होता. अनेकांवर हल्ला करत त्याने चावा घेतला होता. याच रागातून आरोपीने रस्त्याच्या मधोमध असलेल्या या कुत्र्यावर गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कुत्र्याला मारणे किंवा इजा करणे हा गुन्हा असल्याने त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीला कुत्र्याला मारण्याप्रकरणी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;