कुणाल कामराला गद्दार गीतावरून धमकी, मिंधे गटासह पोलिसांना हायकोर्टाची नोटीस

कुणाल कामराला गद्दार गीतावरून धमकी, मिंधे गटासह पोलिसांना हायकोर्टाची नोटीस

गद्दार गीतावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मिंधे गटाकडून धमक्या येत असून, कुणालच्या जिवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी देण्यासाठी तीनदा लेखी अर्ज केला; मात्र पोलीस कुणालचे म्हणणे नोंदवण्यास उत्सुक नाहीत. तर त्याला येथे शारीरिकरीत्या आणण्यास अधिक उत्सुक असल्याचा दावा कुणालच्या वकिलांनी आज हायकोर्टात केला. न्यायालयाने या युक्तिवादाची गंभीर दखल घेत मिंधे गटासह पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

कुणालच्या गद्दार गीतावरून बिथरलेल्या मिंधे गटाने कुणालला कोंडीत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. मिंधे गटाच्या मुरजी पटेल याने याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल केला आहे आहे.

हत्येचा गुन्हा नाही

मुंबईत कुणालला घेऊन येण्यासाठी ठाम असलेल्या राज्य सरकारविरोधात युक्तिवाद करताना अॅड. नवरोज सिरवई यांनी  सांगितले की, कुणाल कामराने हत्येचा गुन्हा केलेला नाही, तर एका स्टँडअप कॉमेडी शोमधून दाखल झालेला हा एफआयआर आहे. कामरा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलिसांना चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;